Social

किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत

किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत
जळगाव — आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांच्या वतीने गोदावरी फाउंडेशन, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थी किरण चेतन तळेले यांना २५,००० ची शैक्षणिक आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
ही मदत कै. एन. एस. पिंपळे स्मृती शैक्षणिक सहाय्य योजना अंतर्गत देण्यात आली.या आर्थिक सहाय्यामुळे किरण यांना शैक्षणिक खर्च भागविण्यास आणि आपले शिक्षण अधिक आत्मविश्वासाने सुरू ठेवण्यास मदत होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.कै. एन. एस. पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, श्री. पिंपळे सर यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे. लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या योजनेद्वारे आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.या वेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डिप्लोमा समन्वयक प्रा. दीपक झांबरे, डिप्लोमा विभागातील प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे आर्थिक अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले. तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि डिप्लोमा समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.गोदावरी फाउंडेशन गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव यांच्या वतीने लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांचे या मोलाच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. तसेच किरण चेतन तळेले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले सहकार्य हे उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button