Crime

धक्कादायक : कामाच्या आमिषाने बोलावून महिलेवर कारमध्ये अत्याचार; जळगावात गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एका तरुणीला कामाच्या निमित्ताने संपर्कात आणून तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64 व 115(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही काही वर्षांपासून एका महिला नाशिक येथे राहत असून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. फेब्रुवारी महिन्यात ती कामानिमित्त जळगावात आली असताना कोर्ट परिसरात तिची ओळख सुनील मधुकर चौधरी रा.धरणगाव नामक व्यक्तीसोबत झाली. संबंधिताने स्वतःचा प्रॉपर्टी विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. काम असल्यास संपर्कासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला.

जून महिन्यात काही दिवसांपूर्वी सुनील चौधरी याने महिलेशी मोबाईलवरून नियमित संपर्क ठेवत मैत्री वाढवली. महिलेला घर भाड्यासाठी ५ हजाराची आवश्यकता असल्याने तिने चौधरी यांच्याकडे ऊसनवार मागितले. पैसे देण्याचे कारण सांगून त्याने पीडितेला जळगाव येथे बोलावले. दि.२४ जून रोजी दुपारी १.३० वाजता शहरातील सागर पार्क येथे त्याने बोलावले. तेथे तिला कारमध्ये बसवून त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणालाही सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ तसेच ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन राणशेवरे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button