Other

जळगावच्या तेजस्विनी सोनवणे हिचा “स्वर्ण भारत पुरस्कार 2025” ने गौरव

जळगावच्या तेजस्विनी सोनवणे हिचा “स्वर्ण भारत पुरस्कार 2025” ने गौरव

स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; दिल्ली येथे झाला सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) – स्केटिंग या क्रीडाप्रकारात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगावची उदयोन्मुख खेळाडू तेजस्विनी विनोद सोनवणे हिला “स्वर्ण भारत पुरस्कार 2025” ने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्ली येथे ‘India Proud Book of Records’ संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तेजस्विनीच्या या यशामुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्रात एक अभिमानास्पद भर पडली आहे. ती सध्या लेवा एज्युकेशन संस्थेच्या नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात शिक्षण घेत आहे.

तिच्या यशामागे लेवा एज्युकेशनचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, तसेच स्केटिंग प्रशिक्षक रणजित पाटील आणि रीना पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

तेजस्विनीने यापूर्वीही विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. स्वर्ण भारत पुरस्कार हा तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित ठरले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button