Other

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’तून जनजागृती

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’तून जनजागृती

नर्सिंग विद्यार्थ्यांचे पथनाट्य; स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव खु., प्रतिनिधी : महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छतेच्या संदेशाच्या पार्श्वभूमीवर गोडावरी फाउंडेशन संचालित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या संकल्पनेतून विकास विद्यालय, जळगाव खु. येथे स्वच्छता जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमात बी.एस्सी. नर्सिंगच्या तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी विकास विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती केली. यावेळी नर्सिंग विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच स्वच्छतेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

पथनाट्यातून स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग असली पाहिजे, असा संदेश देण्यात आला. विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले. ‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांच्यासह अस्मिता जुमडे, सुमित भारंबे, मंजिरी मडावी, वैभव खरे, श्रुती गोरले, निकिता कोळसे, प्रसाद कचोरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विकास विद्यालयाचे प्राचार्य युवराज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण होण्यासोबतच सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button