जळगावात १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा संपन्न
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवार, जळगाव यांच्यातर्फे आयोजन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मिराई लॉन, काळिकामाता मंदिराजवळ, जळगाव कार्यालयात संपन्न झालेल्या या सोहळ्यात – चि. सोहम प्रफुल्ल अत्रे (जळगाव), चि. नयन व देवेश सुधिर अत्रे (रेणवे नगर), चि. सागर व भूषण संजय कोके (पिंपराळा), चि. शौर्य व हर्षल शरद पाटील (इंद्रप्रस्थ नगर, जळगाव), चि. कुशाग्र सुनिल अत्रे (भुसावळ), चि. जिग्नेश मनोहर जोशी (अहमदाबाद), चि. मयुर व चि. वेदांत संजय चौधरी (जळगाव), चि. मोहीत गौरव कुलकर्णी (जळगाव) या बटूंचा सार्वजनिक व्रतबंध समारंभ संपन्न झाला.
या व्रतबंध सोहळ्याचे पौरोहित्य गजानन लपाळीकर व त्यांचे सहकारी यांनी केले. या व्रतबंध सोहळ्यास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामुदायीक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवाराचे प्रकाश मुरलीधर अत्रे व चंद्रकांत अत्रे यांनी केले होते. याप्रसंगी बटूंना आशीर्वाद व मार्गदर्शन वेदशास्त्र संपन्न देवेंद्र गडीकर यांनी केले.
महाराष्ट्र ट्रेडर्सचे संचालक अनिल व प्रशांत जोशी, प्राची सिड्सचे संचालक जितेंद्र अत्रे तसेच अनेक दानशूर व्यक्तींनी बहुमोल सहकार्य केले.






