Social

इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण उत्तरकालीन मुघल व औरंगजेब ग्रंथ प्रकाशन उत्साहात

इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण उत्तरकालीन मुघल व औरंगजेब ग्रंथ प्रकाशन उत्साहात

जळगाव:मराठा विद्याप्रसारक संस्था, जळगाव यांच्या माध्यमातुन स्व. गजाभाऊंचे भारतातील इस्लामी राजवटींचे धार्मिक धोरण उत्तरकालीन मुघल व औरंगजेब या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा २३ ऑक्टोबर रोजी 23 रोजी संध्या. 6:00 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या डॉ. जगदीशचंद्र बोस सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश मदाने, अध्यक्ष जळगाव जनता बॅंक, प्रमुख मान्यवर नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील व श्री निलेश वाणी, विभाग संयोजक शिव शंभू विचार मंच यांच्या उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली.विजय कासार यांनी सदर मंत्र प्रस्तुत केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश वाणी यांनी करताना शिवशंभु विचार मंचचे कार्य आणि उद्देश याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
यावेळी शिवशंभू विचार मंचचे प्रांत सहसंयोजक श्रीकांत पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले स्व. गजाभाऊंनी खुप मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे संशोधन केले आहे व त्यांच्या नंतर सुद्धा अनेक संशोधक त्यांनी तयार केले आहे. आपल्या देशाचा भाग्योदय हा श्री छत्रपति शिवाजी महाराज व धर्मवीर श्री छत्रपति संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी व नविन पिढी पर्यंत पोहचविल्याशिवाय येणार नाही असे म्हणाले.
डॉ. के.बी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिव शंभू विचार मंचच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले . छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांचे विचार घराघरात पोहोचवण्याच्या संकल्पनेचे अभिनंदन केले.
तर श्री सतीशजी मदाने यांनी आपले अध्यक्ष भाषणात खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या पुस्तकाची मदत होणार आहे. इतिहास संशोधकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.
सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. शरद पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सांगता ध्येय मंत्राने झाली.

यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, शहरातील उद्योजक, व्यावसायिक, इतिहास प्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुस्तकासाठी श्री निलेश वाणी 8888877610 व श्री शरद पाटील 7972615656 यांच्याकडे संपर्क करावा.

या

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button