Other

विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेरतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम संपन्न

विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेरतर्फे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम संपन्न

अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा

अमळनेर, विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल, अमळनेर प्रखंडातर्फे दत्त मंदिर, झामी चौक येथे शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करून विजयादशमीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते व रामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख व्यक्तिमत्त्व स्वर्गीय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनकार्याची, हिंदू समाजाच्या संघटनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची तसेच रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

विजयादशमी हा शौर्य, पराक्रम, धर्मरक्षण आणि अधर्मावर विजय मिळविण्याचा संदेश देणारा सण आहे. शस्त्रपूजनाच्या माध्यमातून शस्त्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच शिस्त, धैर्य आणि कर्तव्यभावना जोपासण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संजय शहा, जळगाव जिल्हा सहसंयोजक मितेश कामदार, अमळनेर प्रखंड मंत्री सचिन चौधरी, प्रखंड सहमंत्री विजय बारी, अमर सोनार, प्रखंड संयोजक सचिन महाजन, प्रखंड सहसंयोजक मनोज महाजन, शहर संयोजक विनायक चौधरी,मातृशक्ती संयोजिका ॲड. पद्मिनी भावसार, दुर्गा वाहिनी संयोजिका अनिता चौधरी, सौ. कपिल मुठे, तसेच मनोज मराठे, अभय महाजन, गणेश महाजन, हितेश महाजन, विश्वनाथ मिस्त्री, सागर कोळी, योगेश महाजन, संदीप माळी, योगेश लांडगे यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन, शौर्याची प्रेरणा आणि संघटनात्मक कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल, अमळनेर प्रखंड
🚩 जय श्रीराम! 🚩

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button