जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये यश

जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये यश
सॅमटल एव्हिऑनिक्स आणि व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये पाच जणांची नियुक्ती
जळगाव: गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तंत्रज्ञान व संरक्षण क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी या महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सॅमटल एव्हिऑनिक्स या कंपनीत विजय पाटील व दिपाली खोडके, तर व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीत मोहिनी पाटील, वर्षा चौधरी व राज शिंपी यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची तांत्रिक कौशल्ये आणि महाविद्यालयाकडून दिले जाणारे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. या यशामुळे परिसरात व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





