Social

लोकसंवाद २०२६’ अभियानात सखी वन स्टॉप सेंटरच्या मोफत सेवांची नागरिकांना माहिती

लोकसंवाद २०२६’ अभियानात सखी वन स्टॉप सेंटरच्या मोफत सेवांची नागरिकांना माहिती

जळगाव, प्रतिनिधी ‘लोकसंवाद २०२६’ अभियानांतर्गत येथील जनता बँकेच्या गणेश मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास भेट देणाऱ्या नागरिकांना महिला व बाल विकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटरमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मोफत सेवांची माहिती देण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या अधीक्षक मनीषा खैरनार यांनी नागरिकांना विविध सेवांची माहिती दिली. यावेळी जळगाव जनता बँकेचे जनसंपर्क अधिकारी महेश सावदेकर उपस्थित होते.

सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त व गरजू महिला, पीडित महिलेचे बालक तसेच १८ वर्षांखालील मुलींना मोफत निवासी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच पीडित व गरजू महिलांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व वकिलांची सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
संकटकाळात तातडीने प्रतिसाद देऊन अत्याचारग्रस्त महिलांना आवश्यक मदत व संकटातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य केले जाते. केंद्रामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

तसेच मनोधैर्य योजना, बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना यांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून सहाय्य केले जाते.
गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच कौटुंबिक अत्याचाराबाबत आवश्यक अहवाल तयार करण्यासाठी मोफत पोलीस सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय कुशल समुपदेशकांमार्फत पीडित व गरजू महिलांना मोफत समुपदेशन सेवा दिली जाते.

महिला व बालकांनी संकटाच्या प्रसंगी सखी वन स्टॉप सेंटरच्या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
*********

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button