Social

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव,;-  जळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर ‘लोकशाही दिन’ आयोजित केला जातो. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 3 ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर केलेला असेल आणि त्या अर्जासंदर्भात एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारींसह संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button