OtherSocial

पोलीस अधिक्षकांच्या दरबारी आले जळगावचे ‘रिल्स स्टार’

रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण करणाऱ्या रिल्स क्रिएटर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. समाजामध्ये कायद्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि नागरिकांनी गुन्हेगारीपासून सतर्क राहावे, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.

बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी उपस्थित रिल्स स्टारशी संवाद साधत समाजोपयोगी विषयांवर प्रभावी रील्स तयार करण्याचे आवाहन केले. विशेषतः तरुण वर्ग सोशल मीडियाशी मोठ्या प्रमाणावर जोडला गेल्याने योग्य संदेश देण्यासाठी रील्स हे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी फेटल अपघात व वाहतूक नियमांचे पालन, पॉस्को कायद्याबाबत माहिती, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, महिलांविषयक गुन्हे व कायदेशीर संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीपर रील्स तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

बैठकीस जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध रिल्स क्रिएटर्स उपस्थित होते. त्यामध्ये अमित माळी, संघपाल तायडे, सुरेश राजपूत, समृद्धी पाटील, तन्वी पांडव, भाग्यश्री पाटील, याशिका किनाडा, तेजस्विनी देशमुख, अक्षय नेहते, पवन भोई, आदित्य संभाजी पाटील, ऋषिकेश पवार, हरीदास बोंडे, अजय कुमावत, महेश सुर्वे, निवृत्ती इंगळे आदींचा समावेश होता.

पोलीस प्रशासन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी एकत्र येऊन समाजहितासाठी काम करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचवून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button