Other

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

शासकिय योजनेसोबत कॅशलेस सुविधा देखिल उपलब्ध

जळगाव : मेंदू आणि मज्जासंस्थेशी संंधित गंभीर आजारांवर समग्र व अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत महादेव हॉस्पिटल येथे २४ तास आपत्कालीन सेवेसह अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभाग कार्यरत करण्यात आला आहे. यासाठी शासकिय योजना व कॅशलेस उपचाराची देखिल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यात मल्टीपॅरामीटर मॉनिटरिंग, आयसीपी मॉनिटरिंग, इइजी व्हेंटिलेटर केअर तसेच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अत्याधुनिक अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय न्यूरो-रिहॅलिटेशन अंतर्गत फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि दीर्घकालीन पुनर्वसन नियोजनाचीही सुविधा रुग्णांना मिळणार आहे. स्ट्रोक (लकवा) व्यवस्थापन, इस्केमिक व हेमोरॅजिक स्ट्रोकवरील त्वरीत उपचार, थ्रोम्बोलायसिस, प्रगत अतिदक्षता काळजी, मेंदूतील रक्तस्त्राव, अ‍ॅन्युरिजम, अपस्मार (एपिलेप्सी), मेंदूचे झटके, मणक्याचे आजार, स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी, तीव्र डोकेदुखी व मायग्रेन, मेंदूज्वर आणि मेंदूतील संसर्गांवर विशेष उपचार सुविधा देण्यात येत आहेत. या विभागाचे मुख्य सल्लागार डॉ. कमलेश तायडे एमडी मेडीसिन व एम्स रूग्णालय नवी दिल्ली येथून न्युरोलॉजी शिक्षण घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपचार सेवा दिल्या जात आहेत. तसेच डॉ. हितेश मोरे आणि डॉ. आशिक शेख हे योजना समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. या सुविधेमूळे अनुभवी न्यूरोलॉजिस्ट व क्रिटिकल केअर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना तात्काळ व सुरक्षित उपचार दिले जाणार आहे. .आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय विमा योजनांअंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.अधिक माहितीसाठी संपर्क :०२५७-२२३१००७ / ९९२३६२७२२७ मेंदूच्या प्रत्येक समस्येवर योग्य वेळी योग्य उपचार हे उद्दिष्ट ठेवून महादेव हॉस्पिटलतर्फे आधुनिक न्यूरोलॉजी सेवा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button