डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
अकोला — लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात भुसावळचे रिजन चेअरमन डॉ. उमाकांत चौधरी यांना त्यांच्या वर्षभरातील उत्कृष्ट सामाजिक कार्य, प्रभावी नेतृत्व आणि सेवाभावी योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा सुर्वण पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान दि. २८ जून २०२६ रोजी अकोला येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.हा मानाचा पुरस्कार लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल अश्विनकुमार बजोरिया यांच्या शुभहस्ते डॉ. चौधरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गिरीशजी सिसोदिया, द्वितीय प्रांतपाल सुप्रिया कोतवाल, सचिव डॉ. गर्गे, कोषाध्यक्ष डॉ. मुरारका, अध्यक्ष प्रमोद नेमाडे, गोपाल अग्रवाल, डॉ. भोलाणे तसेच भुसावळ लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उमाकांत चौधरी यांनी रिजन चेअरमन म्हणून कार्यरत असताना सेवा उपक्रम प्रभावीपणे राबविणे, सदस्यसंख्या वाढ मध्ये उल्लेखनीय योगदान, तसेच संघटन कौशल्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि समर्पित सेवाभाव यामुळे त्यांनी विशेष ठसा उमटविला. त्यांच्या या सर्वांगीण कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सुर्वण पदक बहाल करण्यात आला.डॉ. चौधरी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील, डॉ. बोरोले तसेच भुसावळ लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांच्या कार्याचा गौरव हा केवळ भुसावळ लायन्स क्लबसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर डॉ. उमाकांत चौधरी यांनी मिळविलेला हा सन्मान भविष्यातील कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारा असून, त्यांच्या पुढील सामाजिक आणि सेवाभावी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






