Other

एनएच-५३ वरील सर्व्हिस रोडच्या कामाची चौकशी करा

NHAI च्या रोड सेफ्टी गाइडलाइनकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे रियाज बागवान यांचे निवेदन

एनएच-५३ वरील सर्व्हिस रोडच्या कामाची चौकशी करा

NHAI च्या रोड सेफ्टी गाइडलाइनकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे रियाज बागवान यांचे निवेदन

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील एनएच-५३ वर अजिंठा चौकापासून ममता हॉस्पिटल परिसर व मलिकनगर नाल्यापर्यंत सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामात ठेकेदाराकडून NHAI च्या निर्धारित रोड सेफ्टी गाइडलाइन व तांत्रिक अटींकडे दुर्लक्ष करून ड्रेनेजचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक रियाज बागवान यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हायवेला लागून असलेल्या या सर्व्हिस रोडच्या आतील बाजूने नाल्यात ड्रेनेजची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून पावसाच्या पाण्याचा सुरक्षित व योग्य पद्धतीने निचरा होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्याप्रमाणे काम झाले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी मुख्य महामार्गावर येते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. परिणामी अजिंठा चौक व चौफुली परिसरात अपघाताचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.

ममता हॉस्पिटलजवळील नाल्याच्या परिसरात तसेच सर्व्हिस रोडवर पाणी साचत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः मेहरूण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने या कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही संबंधित विभागाकडे तक्रार करून काम थांबविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, दीर्घकाळापासून हा प्रश्न प्रलंबित असून संबंधित विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन

या गंभीर प्रकरणी रियाज बागवान यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन साद केले. या प्रकरणाची चौकशी करून दोष आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे निवेदनात नमूद आहे.

या कामात सर्व्हिस रोडच्या आतील बाजूने नाल्यात नियोजनबद्ध पद्धतीने ड्रेनेज व्यवस्था का करण्यात आली नाही, NHAI च्या रोड सेफ्टी गाइडलाइन व तांत्रिक अटींचे उल्लंघन करून हे काम कोणी व कोणाच्या परवानगीने केले, संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय हे काम करण्यात आले का, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा विविध प्रश्नांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मेहरूण व परिसरातील हजारो नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित हा प्रश्न असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नये. रस्ते विकासाचे काम आवश्यक असले तरी विकासाच्या नावाखाली सुरक्षा नियमांशी तडजोड केली जाऊ नये, अशी भूमिका रियाज बागवान यांनी मांडली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button