Politics

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

जळगाव,भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील या कार्यक्रमाची प्रगती विचारात घेऊन मुदतवाढ देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या 4 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रान्व्ये विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला करण्यात आहे.
त्यानुसार सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटी ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत देणार आहेत. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण / पुनर्रचना कार्यक्रम १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार असून प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत असून नोटीस टप्पा किंवा दावे व हरकती निकालात काढण्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत असणार आहे. तर अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याचे उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी कळविले आहे.
********

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button