Other

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल अॅप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल अॅप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे सर्वसमावेशक मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती व विविध सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘महा-उपलब्धी’ अॅपमध्ये मासिक निवृत्तीवेतन देयकांचा तपशील (Monthly Payment History) पाहण्याची सुविधा, आयकर प्रमाणपत्र (फॉर्म-१६) डाउनलोड करण्याची सुविधा, ई-पीपीओ (e-PPO) लायब्ररी पाहण्याची सुविधा, जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) कोषागार कार्यालयास सादर करण्याची सुविधा तसेच निवृत्तीवेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय (Pension GR) पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या अॅपमध्ये निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पडताळणी करून किंवा पीपीओ क्रमांकाद्वारे सुरक्षितपणे लॉगिन करता येते.

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून ‘महा-उपलब्धी’ अॅप डाउनलोड करून उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button