Politics

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात रक्तदानाचा विक्रम; ग्रामीण मंडळातून १०१ जणांचे रक्तदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात रक्तदानाचा विक्रम; ग्रामीण मंडळातून १०१ जणांचे रक्तदान

चोपडा(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टी चोपडा ग्रामीण पूर्व व ग्रामीण पश्चिम मंडळाच्या वतीने दि.२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गुरुदत्त हॉटेल ॲन्ड लॉजिंग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रक्तदानाचा मान चोपड्याने पटकावला. यापूर्वी भाजप शहर मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. त्यामुळे चोपडा तालुका व शहर मिळून एकूण १८२ रक्तदात्यांनी रक्तदान करत जिल्ह्यात विक्रमी नोंद केली.

विशेष म्हणजे, चोपडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमदार नसतानाही केवळ कार्यकर्त्यांच्या संघटनशक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नियोजनाच्या जोरावर हा जिल्हाभरातील सर्वोच्च रक्तदानाचा उच्चांक गाठण्यात आला. त्यामुळे या उल्लेखनीय कार्याची प्रदेश भाजपाने दखल घेण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने २० लिटर क्षमतेचा पाण्याचा जार व प्रशस्तीपत्र भेट देण्यात आले.
रक्त संकलनाचे कार्य श्री स्वामी समर्थ वैद्यकीय शैक्षणिक व संशोधन संस्था संचलित स्व. श्री. मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर अँड ब्लड कॉम्पोनंट, शिरपूर जि. धुळे यांच्या वैद्यकीय पथकाने यशस्वीरीत्या पार पाडले.

याप्रसंगी भाजपाचे पश्चिम विभाग तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील,पूर्व विभाग अध्यक्ष पिंटू पावरा,पूर्व विभाग जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, पश्चिम विभाग जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा सौ.संध्या महाजन,जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील,जिल्हा चिटणीस हनुमंतराव महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज पाटील, माजी जि.प.आरोग्य सभापती दिलीप पाटील, माजी जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, पं.स.माजी सभापती प्रा.भरत पाटील,चो.सा.का.माजी चेअरमन अतुल ठाकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय बाविस्कर,तीर्थक्षेत्र विकास आघाडी जिल्हाध्यक्ष हिम्मतराव पाटील,विस्तारक भरत सोनगिरे, जितेंद्र चौधरी, दीपक भोसले, योगराज जाधव, एकनाथ पाटील, विनायक पाटील, तुषार पाटील, योगेश महाजन, पिंटू पाटील, विठ्ठल पाटील, गुलाब पाटील, हर्षल पवार, प्रभाकर महाजन, विवेक गुजर, संदीप महाजन, धनंजय पाटील, विकी सनेर, रवी मराठे, अनिल पाटील, पंकज पाटील, लक्ष्मण पाटील, भागवत पाटील यांच्यासह सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख तालुका व जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.रक्त संकलनासाठी डॉ.मनोजसिंग परदेशी, भाग्यश्री राजपूत,योगेश चौधरी,चंद्रशेखर पाटील कल्पना अहिरे,अनिता पावरा, पंडित पावरा यांनी परिश्रम घेतले

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button