Other

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात शुक्रवारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटील, माजी महानगराध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे महानगराध्यक्ष एस. डी. पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जळगाव शहर विधानसभा प्रमुख राजूभाऊ मोरे, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील भैय्या माळी, कार्यालय मंत्री सतीश चौव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button