गरीब कुटुंबातील दोन्ही भावांनी नीट परीक्षेत मिळवले घवघवीत यश; माचला गावाचा गौरव

गरीब कुटुंबातील दोन्ही भावांनी नीट परीक्षेत मिळवले घवघवीत यश; माचला गावाचा गौरव
प्रतिनिधी रविंद्र कोळी माचला (ता. चोपडा): आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर माचला गावातील गरीब कुटुंबातील दोन सख्ख्या भावांनी NEET 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
जयेश लालगीर गोसावी याने NEET 2026 परीक्षेत 414 गुण मिळवले असून, बायोलॉजी विषयात 331 गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच त्याचा भाऊ खुशाल लालगीर गोसावी याने 368 गुण मिळवत यश संपादन केले आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही दोन्ही भावांनी अथक परिश्रम, नियमित अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे माचला गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांकडून आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचेही सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.






