Politics

देवेंद्र फडणवीस साहेब, जरा सावध व्हा, जागे व्हा !

देवेंद्र फडणवीस साहेब, जरा सावध व्हा, जागे व्हा !

मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यास कुणीतरी फार उत्सूक आहे !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई:- देवेंद्र फडणवीस साहेब, जरा सावध व्हा, जागे व्हा ! मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यास कुणीतरी फार उत्सूक आहे ! असा सल्ला वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

खडसे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ दिला आहेत. त्यात त्या म्हणाल्या की, आधी ‘ऑपरेशन टायगर’ करून उद्धवजी ठाकरे यांचे सहा खासदार फोडले आणि खासदारांच्या संख्येत वाढ करून स्वतःच्या पक्षाला महायुतीतील एक नंबरचा पक्ष केले.
इतकं करूनही मुख्यमंत्री पद मिळत नाहीये म्हणून तर तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी तर टीईटीचे पेपर फोडले गेले नाही ना ? कारण टीईटी पेपरफुटीचा उगम हा ठाण्यात आढळलाय. विचार करा… जागे व्हा देवेंद्र फडणवीस साहेब जागे व्हा… असे त्या म्हणाल्या.

https://x.com/i/status/2070821765534876124

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button