दोन वर्षापासून हद्दपार आरोपीला शहर पोलिसांनी कट्यारसह पकडले

महा पोलीस न्यूज | ८ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपी शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर पोलिसांनी दि.७ मार्च रोजी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कट्यार हस्तगत केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातून २ संदीप भास्कर ढोके वय – २७ रा. गेंदालाल मिल हा शाळेच्या गेट क्रमांक २ परीसरात हातात कट्यार घेऊन दहशत माजवित आहे असल्याची माहीती शहर पोलिसांना मिळाली होती. पथकाने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परिसरातून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून एक लोखंडी कट्यार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या सूचनेनुसार तेजस मराठे, किशोर निकुंभ यांनी केली आहे.