EducationSocial

प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे भारत अभियानांतर्गत प्रतिज्ञा व जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे भारत अभियानांतर्गत प्रतिज्ञा व जनजागृती कार्यक्रम संपन्न

चोपडा, दि. १८ ऑगस्ट : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे राबविण्यात येणाऱ्या “१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महा अभियान” अंतर्गत प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे व्यसनमुक्ती जनजागृती व प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नशा, मादक पदार्थ तसेच मोबाईलच्या अतिवापरासह इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. निरोगी, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारी विविध आकर्षक घोषवाक्ये असलेली पोस्टर्स तयार करून जनजागृती केली. या पोस्टर्समधून विद्यार्थ्यांनी “व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार” असा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमात ब्रह्माकुमारी शितल दीदी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित राहण्यासाठी उपयुक्त उपायही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त भारताच्या संकल्पाला दृढ पाठिंबा दर्शविला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. चेतना बडगुजर यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी, सकारात्मक विचारसरणी, आत्मसंयम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button