Social

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जळगाव,  : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) संदर्भातील अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृह येथे जिल्हा पेंशन व पी.एफ.कार्यशाळेचे १९ जुन रोजी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस जळगाव जिल्ह्यातील एकूण २४३ निवृत्तीवेतनधारक तसेच ७० आहरण व संवितरण अधिकारी प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेदरम्यान सहभागींकडून एकूण ११२ तोंडी प्रश्न मांडण्यात आले. त्यापैकी सुमारे ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव व महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्या मार्फत करण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान एकूण ६५ लेखी अर्ज प्राप्त झाले असून त्यांची शहानिशा करून महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्याशी संबंधित बाबींवर पुढील स्तरावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ लेखाधिकारी श्रीमती जया गोमेझ यांनी दिली.

ही कार्यशाळा जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), मुंबई येथील श्रीमती जया गोमेझ, महादेव एम. करांडे, श्रीमती सुप्रिया केळुस्कर व हिमांशू पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अपर कोषागार अधिकारी खलील पटेल यांनी उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण केले.

कार्यक्रमास अपर कोषागार अधिकारी राजू पाटोळे, अपर कोषागार अधिकारी गजानन देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कोकरे यांनी केले तर खलील पटेल यांनी आभार व्यक्त केले केले.
***********

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button