Other

हद्दपार असूनही चॉपर घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर शनिपेठ पोलिसांची कारवाई; चॉपर जप्त

हद्दपार असूनही चॉपर घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर शनिपेठ पोलिसांची कारवाई; चॉपर जप्त

जळगाव | ४ जून – शहरातील आंबेडकर नगर परिसरात हद्दपार असतानाही चॉपर घेऊन फिरत दहशत पसरवणाऱ्या दोघा तरुणांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एक धारदार चॉपर जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत प्रताप चौधरी (वय २०) व मनीष भगवान सपकाळे (वय २३), दोघेही रा. शंकरराव नगर, जळगाव, हे दोघे २ जून रोजी आंबेडकर नगर भागात संशयास्पद हालचाली करत फिरत होते. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पथकाने तत्काळ धाव घेतली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील एक धारदार चॉपर हस्तगत केला.

तपासात उघडकीस आले की, निशांत चौधरी हा यापूर्वी पोलिस कारवाईनंतर शहरातून हद्दपार करण्यात आला होता. तरीदेखील तो चॉपर घेऊन शहरात फिरत असल्याने कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत होता.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button