सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी हाजी जाकीर कुरेशी यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टी संपन्न

सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी हाजी जाकीर कुरेशी यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टी संपन्न
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत भडगाव शहरात भव्य इफ्तार सोहळा
भडगाव प्रतिनिधी:
सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी हाजी जाकीर कुरेशी यांच्या वतीने भडगाव येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून, या काळात उपवास (रोजा) धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो. समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावे, या उद्देशाने हाजी जाकीर कुरेशी यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचे आयोजन केले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित या सोहळ्यात एकोप्याचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू-मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्त्व यावर भाष्य केले. “धर्म हा जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही,” असे सांगत हाजी जाकीर कुरेशी यांनी सर्वांना सलोखा आणि प्रेम यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघटनेचे तात्यासाहेब पवार, नवल सर, बी. बी. पाटील सर, संजय देशमुख, डी. टी. वाघ सर, गुणवंतराव जाधव, जी. झेड. पाटील सर, माऊली फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, समीर सूर्यवंशी, योगेश शिंपी, प्रवीण पाटील, गणेश पाटील, सुशील महाजन, रवींद्र कुलकर्णी, संजय सोनार कळवाडीकर, माजी नगराध्यक्ष गणेश अण्णा परदेशी, सुनील भाऊ देशमुख, आबा चौधरी, मोहन सोनार, राजेंद्र अहिरे, इमरान अली सय्यद, हाजी मोहसीन खाटीक, निसार खान, पत्रकार सागर महाजन, संजय पवार, सुनील कासार, अबरार मिर्झा, स्लाउद्दीन शेख, हय्युम सय्यद तसेच समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रऊफ सर, आमीन कुरेशी, साबीर सर, जमील कुरेशी, फारुख पिंजारी, कमिल कुरेशी, रहीम कुरेशी, अकील कुरेशी, नईम कुरेशी, रमजान कुरेशी, सलमान कुरेशी, जिया खान, असरार खान, हाफिज अय्युब कुरेशी, मुनाफ कुरेशी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान अली सय्यद यांनी केले, तर आभार हाजी जाकीर कुरेशी यांनी मानले.