Crime

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी; फरार आरोपी अकोल्यातून जेरबंद

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी; फरार आरोपी अकोल्यातून जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ४७.४८ ग्रॅम सोन्यासह सुमारे ४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत त्याला अकोला शहरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील ४७.४८ ग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध

भुसावळ तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६ आणि बोदवड पोलीस ठाणे गु.र.नं. १२८/२०२६ या गुन्ह्यांमध्ये आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) हा फरार होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, तो अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने अकोला येथे रवाना होऊन गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

दोन गुन्ह्यांतील सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

आरोपीकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील ३२.४०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे किंमत ३ लाख २० हजार रुपये, जप्त करण्यात आली.

तसेच बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये, जप्त करण्यात आली.

अशा प्रकारे या कारवाईत एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोहेकॉ संदिप चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख तसेच तांत्रिक मदत करणारे पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील व मिलिंद जाधव यांचा सहभाग होता.

अटक आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button