भडगाव तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

भडगाव प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यांनी आज भडगाव तहसिलदार श्री. शितल सोलाट यांना कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,अतिदृष्टी व बोंड आळी ने आम्हा त्रस्त केले असून उत्पादनात अतिशयोक्ती घट आलेली आहे खाजगी कापूस व्यापारी कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहे व भडगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने इतर तालुक्यातील केंद्रावर कापूस विक्रीसाठी जाण्यास वाहतुकीस खर्च न झेपणार आहे व सदर केंद्रावर आम्हास साम्नीक वागणूक दिली जात आहे मागच्या वेळी भडगाव शहरातील जिनिंग मध्ये महाराष्ट्र पणन महासंघाची खरेदी सुरू होती पण यावर्षी आमच्या तालुक्याला जाणून बुजून टाळण्यात आले आहे सरकार आमच्यासाठी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व आतोनात आल होत आहेत आपणास कळकळीची विनंती आहे की पाचोरा व भडगाव मार्केट कमिटी एकच असल्याने पाचोर्यातील सी. सी. आय खरेदी केंद्र आठवड्यातील काही दिवस भडगाव शहरातील जिनिंग मध्ये सुरू करण्यात यावी.जर आमची मागणी योग्य समाधान एका आठवड्यात झाले नाही. तर आम्हा स आत्मदहन शिवाय पर्याय राहणार नाही. आदी मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी अनिल पाटील, रमेश शिरसाट, सागर परदेशी, आकाश कंखरे, दीपक महाजन, धर्मराज शिंदे, दीपक पाटील, रवींद्र देवरे, सुरेश पाटील, दिनेश देवरे, माधवराव पाटील, सुरेश पाटील, आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.