Other

सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा निषेध व कडक कारवाईची मागणी 

सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा निषेध व कडक कारवाईची मागणी 

जळगाव प्रतिनिधी भारत देश व भारतीयांनी नेहमी आपल्या महान व प्राचीन संस्कृतीला अनुसरून सर्व देशांचे व देशवासीयांचे नेहमी सन्मान व आदर केलेला आहे. कधीही भारतीयांनी स्वतः हून कोणत्याही देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला नसून नेहमीच सन्मानच केलेला आहे.
परंतु असे असतांना सुद्धा अमेरिकेत एका नालायकाने कोणतेही कारण नसतांना भर चौकात रस्त्यावर, भर दिवसा आपल्या भारताचे आन – बान – शान म्हणजेच ओळख असलेल्या भारतीय ध्वज पवित्र तिरंगा फाडून , जमिनीवर फेकलेलाअसून पायदळी तुडविलेला आहे. हे कृत्य म्हणजे ज्या दिवसापासून तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता मिळालेली आहे ते आजतायागत या तिरंग्यासाठी, त्याचा सन्मान व संरक्षणासाठी शहीद झालेल्या तमाम भारत मातेच्या वीर सुपुत्रांचा सुद्धा त्या नालायकाने घोर अपमान केलेला असून यामुळे समस्तभारतवासीयांचे मन दुखावले गेले असून जो पर्यंत या नालायकाला खडक शासन शिक्षा होत नाही, तो पर्यंत आपल्या सरकारने अमेरिकेशी कोणतेही व्यवहार करू नये, तसेच महामहीम पंतप्रधान साहेब भारत सरकार नवी दिल्ली यांनी अमेरिकेचे महामहीम राष्ट्रपती साहेबांशी स्वतः या विषयी संवाद साधून आम्हा समस्त भारतवासीयांच्या भावना कळवून त्या नालायकाचे हात छाटन्याची मागणी करावी अशी मागणी आज मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव मार्फत सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे निवेदन देऊन करण्यात आली. तसेच या प्रसंगी ” तिरंगे का अपमान नही सहेगा हिंदुस्तान, हमसे जो टकराएगा वह मिट्टी में मिल जाएगा ” अश्या घोषणा देऊन आपला रोष व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकूर बादशाह, सय्यद जावेद, शफी ठेकेदार, सय्यद उमर, कामील खान, शफीक अहमद इ. उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button