Other

दुर्दैवी : भरधाव कार झाडावर धडकली, १ ठार, तीन गंभीर

महा पोलीस न्यूज | १४ जुलै २०२४ | पाचोराकडून हॉटेलमधून जेवण करून जळगावात परतत असलेल्या कारचा ताबा सुटल्याने कार थेट झाडावर धडकल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. या अपघातात इतर ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनंदा शांताराम सोनवणे वय-३९ रा. कासमवाडी, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे आनंदा सोनवणे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. दोन भाऊ, आई-वडील, पत्नी, दोन मुलांसह ते वास्तव्याला होते. रविवार दि.१४ जुलै रोजी दुपारी ते मित्र तर भैरव भगवान राणे, प्रवीण उर्फ पप्पू आढाव आणि योगेश भालचंद्र रेम्बोटकर सर्व रा.कासमवाडी यांच्यासोबत चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीझेड.१२१२ ने शिरसोली गावाजवळील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

दरम्यान, जेवण आटोपून कासमवाडी येथे येण्यासाठी निघाले असता दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे एका झाडावर त्यांची कार आदळली. या भीषण अपघातात आनंदा सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले भैरव राणे, पप्पू आढाव आणि योगेश रेंभोटकर हे गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मित्रपरिवार व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि मित्र परिवाराने धाव घेतली. चौघांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. आनंदा सोनवणे सारखा सच्चा कार्यकर्ता हरपल्याने सर्वांनी एकच हळहळ व्यक्त केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button