Crime

गावठी कट्टा आणि जिवंत काडतुससह एकाला अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई ; ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

गावठी कट्टा आणि जिवंत काडतुससह एकाला अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई ; ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, ;-  कुसुंबा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली असून पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि होंडा शाईन दुचाकी असा एकूण ७२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

८ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुसुंबा परिसरात तुषार अशोक सोनवणे (रा. खेडी आव्हाणे) नावाचा तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक छगन तायडे, किरण पाटील आणि राहुल घेटे यांना घटनास्थळी पाठवण्यात आले.

संशयिताचा पाठलाग करून अटक

पथक हॉटेल पुष्पा (नशिराबाद रोड) येथे गस्त घालत असताना, हळदी रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण मोसावर बसलेला आढळला. पोलिस त्याच्या दिशेने जाताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

अटक केल्यानंतर संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या कमरेत २०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि २,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच, ५०,००० रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकीही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन ठाकूर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस नाईक योगेश बारी करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button