
किलबिल बालक मंदिर” शाळेमध्ये “मातृ प्रबोधन व वार्षिक बक्षीस वितरण
माता पालकांना तिळगुळ, हळदीकुंकू व अथर्वशीर्ष पुस्तकाचे वाटप
जळगाव प्रतिनिधी I
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित” किलबिल बालक मंदिर” शाळेमध्ये “मातृ प्रबोधन व वार्षिक बक्षीस वितरण ” कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉ. शुभदा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी माता पालकांना मुलांचे संगोपन व जबाबदारी या विषयावर “माता पालकांची भूमिका” याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गुरुवर्य प वि पाटील शाळेच्या शिक्षिका कल्पना तायडे यांनी मुलांमध्ये तुलना करू नये अशी मौलिक माहिती माता पालकांना दिली.
तसेच विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच माता पालकांना तिळगुळ, हळदीकुंकू व अथर्वशीर्ष पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक केले. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.