Other

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

जळगाव, प्रतिनिधी

आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजना आणि शासकीय सेवांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे करण्यात आला.

आमदार चंद्रकांतजी सोनवणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्ररथाचे उद्घाटन करून त्यास हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भरत सोळुंके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे, प्रवीण दाभाडे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांनी अभियानास शुभेच्छा देत शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये भ्रमण करून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. ‘शासनाच्या योजना – थेट लाभार्थ्यांपर्यंत’ या संकल्पनेनुसार कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अभियानाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button