Education

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

जळगाव प्रतिनिधी

भारतरत्न सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल एच. पंडित, पवन शिंपी, अमोल पारेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत सर्जनशील विचार, आत्मविश्वास व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले.

यशस्वी आयोजनासाठी प्रा. तुषार कोळी, डॉ. नितीन भोळे, डॉ. हेमंत इंगळे, प्रा. निलेश वाणी, प्रा. महेश एच. पाटील व डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभाग
गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागात टीमच्यावतीने अभियांत्रिकी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. एच. टी. इंगळे, प्रा. डॉ. आय. एस. जाधव, प्रा. डॉ. व्ही. डी. चौधरी, प्रा. डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. एम. एन. पाटील आणि प्रा. हेमराज धांडे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व रंजक क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button