Education

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार,समस्या सोडविण्याची क्षमता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उद्योजकतेची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६ अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी इंटरनल हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रमुख परीक्षक व युवा उद्योजक अजिंक्य तोतला, तसेच अधिष्ठाता व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झाले. प्रारंभी महाविद्यालयीन समन्वयक डॉ. अतुल बर्हाटे यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची संकल्पना, स्पर्धेचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या विविध संघांनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या विभागांमध्ये दिलेल्या समस्यांवर आधारित नावीन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाधारित उपाय सादर केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले.स्पर्धेचे परीक्षण अजिंक्य तोतला यांनी केले. अंतर्गत परीक्षणासाठी डॉ. निलेश चौधरी, डॉ. सचिन महेश्री आणि डॉ. किशोर महाजन यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

समारोपप्रसंगी तोतला यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून संवादकौशल्य, शब्दसंग्रह, देहबोली आणि मुद्देसूद मांडणी यावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. झालेल्या चुका ओळखून त्यातून शिकत पुढील संधींसाठी अधिक सक्षम होण्याचा संदेश त्यांनी दिला.

विजेते संघ :प्रथम अल्गोनिक्स संघ, द्वितीय डिजिटल टायटन्स संघ, तृतीय अॅग्निटर्स एक्स संघ.सूत्रसंचालन रिद्धी भिरुड, मोईश नारखेडे, प्रतीक वारके आणि डिंकी शदानी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button