Other

जळगावातील परमीट रूम उद्या बंद राहणार, शुल्कवाढीविरोधात संघटनेचे आंदोलन

महा पोलीस न्यूज । दि.१९ मार्च २०२५ । जळगावातील परमीट रूम उद्या गुरुवारी बंद राहणार आहेत. परमीट रूम व्यवसायाचे नूतनीकरण शुल्क प्रत्येक वर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवले जात आहे. या शुल्कवाढीच्या निषेधार्थ खाद्यपेय विक्रेता मालक-चालक संघटनेतर्फे गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी २ या वेळेत जिल्ह्यातील परमीट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संघटनेची नुकतीच एक बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. हातगाडे, ढाबे, हॉटेल्स या ठिकाणी कमी दंडात्मक कारवाई झाल्याने परमीटवर परिणाम होत आहे. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा हा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या मागण्यांचा तातडीने विचार व्हावा, यासाठी गुरुवारी व्यवसाय बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

तालुकास्तरावर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button