Detection

गावठी कट्टा घेऊन दहशत केली, एमआयडीसीच्या जेलची हवा खाल्ली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा परिसरातून एका संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. अमोल सुरेश खैरनार (वय २८, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जळगाव एमआयडीसी पोलिसांना ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ एका व्यक्तीने गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे, किरण पाटील, नितीन ठाकूर आणि राहुल घेटे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

पोलिसांची गाडी पाहताच, संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले. झडती घेतली असता, त्याच्या कमरेला १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून तो कट्टा जप्त केला.

याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल घेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button