Politics
मोठी बातमी : स्मिता वाघ, रक्षा खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महा पोलीस न्यूज । २५ एप्रिल २०२४ । महायुतीच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे या आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु उपमुख्यमंत्री यांना येण्यास उशीर होत असल्याने दोघांनी उमेदवारी अर्ज दुपारी दाखल केला आहे.
महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यायला काही काळ उशीर असल्याने गैरसोय टाळण्यासाठी दोन्हीही उमेदवारांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे.