Other
निधन वार्ता : आमदार किशोरआप्पा पाटील यांना मातृशोक

महा पोलीस न्यूज । दि.२४ फेब्रुवारी २०२५ । पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री गं.भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील (वय-९२) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे ४.५५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथून दुपारी ३ वाजता निघणार असून अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल. नर्मदाबाई यांच्या पश्चात आमदार किशोरआप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे.