Other

रावेर-यावलमध्ये लंपीचा प्रादुर्भाव; तातडीने लसीकरण करा – आमदार अमोल जावळे

रावेर-यावलमध्ये लंपीचा प्रादुर्भाव; तातडीने लसीकरण करा – आमदार अमोल जावळे

रावेर प्रतिनिधी

रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहे.

रावेर व यावल तालुक्यातील बाधित तसेच संभाव्य बाधित गावांमध्ये तातडीने पशुवैद्यकीय पथके पाठवून जनावरांची तपासणी करावी, बाधित जनावरांचे विलगीकरण करावे तसेच आवश्यक औषधोपचार व रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात, अश्या सूचना आमदार जावळे यांनी केल्या आहे.

तसेच विशेष लसीकरण मोहीम राबवून पुरेशा प्रमाणात लस, औषधे व पशुवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात याव्यात. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करून जनावरांची काळजी, विलगीकरण आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अंतर्गत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवून रोगाचा प्रसार इतर गावांमध्ये तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये होणार नाही, यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

लंपी रोगामुळे बाधित अथवा मृत झालेल्या पशुधनाबाबत शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करून पात्र पशुपालकांना शक्य ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.

पशुधन हे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, लंपी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने प्रभावी उपाययोजना व विशेष लसीकरण मोहीम राबवावी, अशी भूमिका आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button