Other

रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड

रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड

भुसावळ : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने विभागीय आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धेत आदित्यने ४०० पैकी तब्बल ३९५.७ गुण मिळवत नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची नागपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही आदित्यकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आदित्यच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button