चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
चोपडा, प्रतिनिधी
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा. येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमांचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विभागांचे उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबनाच्या विचारांचा तसेच लालबहादूर शास्त्रीजींच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व राष्ट्रसेवेच्या आदर्शांचा उल्लेख करून त्यांच्या विचारांतून प्रत्येकाने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “महात्मा गांधीजींचे सत्य-अहिंसेचे विचार आणि लालबहादूर शास्त्रीजींची प्रामाणिक राष्ट्रसेवा आजही समाजाला योग्य दिशा देणारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही महान राष्ट्रपुरुषांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.







