Other

हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाणी वाटप

हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाणी वाटप

जळगाव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशनतर्फे जळगावातील इच्छादेवी चौकात सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात ४०० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

१४ एप्रिल रोजी इच्छादेवी चौकात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उन्हाच्या झळा आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन रस्त्यावरील पादचारी, वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांना थंड पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. या उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता आणि बंधुत्वाच्या विचारांना उजाळा दिला.

उपक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल भाई खान, जिल्हा मार्गदर्शक दगडू दादा, नीरज भाई जयस्वानी, रोशन भाई शहा, बाल्या भाऊ, प्रकाश सोनवणे, आयाम शेख, अमीर भाई सय्यद, दीपक भाऊ सोनवणे यांच्यासह अनेक सदस्य आणि पेंटर बांधव उपस्थित होते. सर्वांनी मिळून एकतेचा संदेश देत उपक्रम यशस्वी केला.

पाणी वाटपाच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. अनेकांनी असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशनने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button