Crime

एमआयडीसी परिसरात घरफोडी करणारे दोन सराईत जेरबंद 

आरोपींकडून 54 हजारांचा मुद्देमाल जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव | महापोलीस न्यूज l १३ मे २०२५
एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत एमआयडीसी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५४ हजार रुपये किमतीचे चोरलेले तांब्याचे तार हस्तगत केले असून, उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे

जगवाणी नगरातील गेटसमोरील दुकान क्रमांक चारमध्ये रात्री साडेचारच्या सumarास अज्ञात चोरट्यांनी शटर आणि चैनल गेट तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी त्यांनी सुमारे एक लाख 85 हजार रुपये किमतीचे रुपये किमतीचे तांब्याचे स्क्रॅप लंपास केले. या घटनेची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.

पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार राहुल घेटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पहिला संशयित रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपला साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२) याचे नाव उघड केले. पोलिसांनी रामानंदनगर परिसरात पाठलाग करून रणजितसिंगला अटक केली.

५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून १०० किलो वजनाचे नवीन आणि जुने तांब्याचे तार असा ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चोरलेला उर्वरित माल कोठे विकला गेला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

यांनी केली कारवाई

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पो.उ.नि. राहुल तायडे, पो.हे.काँ. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी, पो.कॉ. नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंह पाटील, रवी नरपाळे आणि अक्रम शेख यांनी  कामगिरी बजावली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button