कराब व गिरड येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात

कराब व गिरड येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात
भडगाव प्रतिनिधी
भडगाव शहरातील कराब व तालुक्यातील गिरड येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरवर भडगाव महसूल पथकाने कारवाई केलेली असून हे ट्रॅक्टर भडगाव येथे जप्त करण्यात आले आहे.
गिरड येथील भाईदास विठ्ठल पाटील यांचे मालकीचे अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय भडगाव येथे जमा केले. ही कारवाई भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश येंडे, सुनिल मांडोळे,रामकृष्ण मनोरे, यांनी केली
तसेच
कराब येथील नदीपत्रातून दिनेश हरी महाजन याचे अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय भडगाव येथे जमा केले. ही कारवाई व्ही.पी.शिंदे ,पि.ए.हलकारे, प्रशांत कुंभारे, प्रमोद पाटील,एम.जे.खाटीक ,लोकेश महाजन, आदींनी केली.