Other

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींची टवाळखोर तरुणांनी काढली छेड

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही तरुणींची टवाळखोर तरुणांनी काढली छेड

मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी

जळगाव प्रतिनिधी

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी संत मुक्ताई यांच्या यात्रेदरम्यान छेड केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला असून याप्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी टवाळखोरांच्या अटकेसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. या घटने मुले खळबळ उडाली असून मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चार तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी संबंधित तरुणांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रक्षा खडसे संतप्त झाल्या असून, त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

संत मुक्ताई यात्रेत मोठ्या संख्येने भक्तगण व नागरिक सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने महिलांवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या प्रकारानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच सुनावले. “मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या कि कोथळी येथे दरवर्षाप्रमाणे यात्रा भरते माझी मुलगी हि शुक्रवारी यात्रेत गेली असता तिची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आपण मुली सोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सागितले .

 

 

 

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button