Other

विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६ अंतर्गत पंतप्रधानांचा युवकांशी आभासी संवाद; जळगावात थेट प्रक्षेपणास उत्स्फूर्त प्रतिसाद

विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६ अंतर्गत पंतप्रधानांचा युवकांशी आभासी संवाद; जळगावात थेट प्रक्षेपणास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, दि.२६ : मेरा युवा भारत (MY Bharat), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम (Viksit Vibrant Village Programme – VVVP) २०२६ अंतर्गत निवड झालेल्या युवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभासी संवाद संपन्न झाला. या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे MY Bharat स्वयंसेवकांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, जिल्हा युवा अधिकारी, माझा युवा भारत अभिषेक चवरे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत विकसित भारत @२०४७ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. राष्ट्रनिर्माणात युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, नवकल्पना, नेतृत्व व सामाजिक बांधिलकी यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६ हा दि. ४ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत लडाख, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड राज्यांतील ७४ सीमावर्ती गावांमध्ये आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून देशभरातील युवकांना सीमावर्ती भागातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व विकासात्मक पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली.

जळगाव जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी कमलेश सोनवणे व योगेश अग्रवाल यांची निवड झाली होती. त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सीमावर्ती गावांमधील अनुभव आत्मसात केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित या आभासी संवाद कार्यक्रमात MY Bharat जळगावचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमामुळे युवकांना देशाच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान कसे देता येईल, याबाबत मार्गदर्शन मिळाले.

यावेळी केंद्रीय युवा क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जिल्ह्यातील युवकांना अशा राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button