अमळनेर युवासेनेतर्फे शिवसेनेचा ६० व्या वर्धापन दिनी रिक्षाचालकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा

अमळनेर युवासेनेतर्फे शिवसेनेचा ६० व्या वर्धापन दिनी रिक्षाचालकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा
अमळनेर: “मेहनत, जिद्द आणि संघटनेप्रती निष्ठा असेल तर एक सामान्य माणूसही राज्याच्या सर्वोच्च पदावर बसू शकतो!” हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून देणारे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या धगधगत्या प्रवासाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आज अमळनेरात शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन अत्यंत हटके अंदाजात साजरा करण्यात आला.
अमळनेर युवासेनेच्या वतीने आज थेट रस्त्यावरील ‘किंग’ म्हणजेच रिक्षाचालक बांधवांना मिठाई आणि पेढे भरवून हा सुवर्णमयी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिवसेना ही नेहमीच सर्वसामान्यांना आणि तळागाळातील कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी देणारी संघटना राहिली आहे. एक सामान्य रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे ययांचाथक्क करणारा प्रवास आजच्या प्रत्येक तरुणासाठी ऊर्जा देणारा आहे. याच प्रेरणेतून युवा सैनिकांनी आज रिक्षाचालक बांधवांसोबत वर्धापन दिनाचा गोडवा वाटून घेतला आणि सर्वसामान्यांच्या या पक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्ष केलाय. आज ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेची जनसेवेची परंपरा, जाज्वल्य हिंदुत्वाची विचारधारा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अखंड कार्य करण्याचा संकल्प अमळनेरच्या युवा सैनिकांनी केला आहे!”
– अमळनेर युवासेना
या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी अमळनेर शहरातील शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक, शिवसेना व युवासेनेचे धडाडीचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. ‘जय महाराष्ट्र’, ‘जय शिवसेना’ आणि ‘एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो…’ च्या प्रचंड घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. अमळनेर युवासेनेचा हा अनोखा उपक्रम आज शहरात प्रचंड चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.






