समुपदेशन पद्धतीने २५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती; करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत प्रक्रिया

समुपदेशन पद्धतीने २५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती; करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत प्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद अंतर्गत परिचर (वर्ग-४) पदावर कार्यरत असलेल्या २५ कर्मचाऱ्यांना समुपदेशन पद्धतीने आरोग्य सेवक (वर्ग-३) पदावर पदोन्नती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत ही पदोन्नती प्रक्रिया बुधवारी (दि. २४) जिल्हा परिषदेत पार पडली.
जिल्हा परिषद सेवेत परिचर (वर्ग-४) म्हणून कार्यरत असलेले २५ कर्मचारी पदोन्नतीस पात्र ठरले होते. त्यांना वर्ग-३ मधील आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, प्रशासन अधिकारी डॉ. राजेश जैन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकाच वेळी २५ कर्मचाऱ्यांना वर्ग-४ मधून वर्ग-३ मध्ये पदोन्नती मिळाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवक म्हणून अधिक जबाबदारीने आणि गुणवत्तापूर्ण सेवा देत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी केले.






