Social

अतिवृष्टीनंतर संभाव्य साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रनेणे सतर्क रहावे– करिश्मा नायर

अतिवृष्टीनंतर संभाव्य साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रनेणे सतर्क रहावे– करिश्मा नायर

जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अमळनेर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची पाहणी केली तसेच औषधसाठा, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संभाव्य साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने अधिक दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यापूर्वी पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुले तसेच दुसरा व तिसरा हप्ता वितरित न झालेल्या प्रकरणांचा आढावा घेतला. घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देत कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button