Crime

अवैधरीत्या गॅस सिलेंडर घेऊन जाणारा टेम्पो पकडला 

श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई ; १७० गॅस सिलेंडर जप्त 

श्रीगोंदा प्रतिनिधी : -अवैधरीत्या 170 गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो श्रीगोंदा पोलिसांनी येथील बस स्थानकाजवळ पकडून या टेम्पोमध्ये अवैधरीत्या असलेले 170 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार त्यांनी श्रीगोंदा बस स्थानकाजवळ तपासणी दरम्यान टेम्पो अडवून यात सहा लाख 63 हजार रुपयांच्या गॅस हंड्या आणि वीस लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या या धडक करवाईमुळे गॅसची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम  केले असून त्यांनी  गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण केला आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरले आहेत

या मोठ्या धडक कारवाईमुळे सर्वत्र श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यशैलीचे कौतुक होत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button